
“Fondly remembering Mana Sajjan — a gentle heart whose kindness touched many lives.”
Sakal
विविध विचारधारांचे प्रवाहीपण हे सशक्त लोकशाहीचे एक लक्षण मानले जाते. किंबहुना, ही विविधताच लोकशाही राष्ट्राचा आत्मा आहे. भारताच्या घटनेच्या उज्जीविकेतही हे आवर्जून नमूद केले गेले आहे. पण वास्तव तसे असतेच असे नाही. एकमेकींशी टकराव घेणाऱ्या या विचारधाराच मतपेढ्यांचा मैला घेऊन वाहू लागल्या की त्याला नाल्याचे रुप येते. मतांच्या ध्रुवीकरणापायी लोकशाहीतील मूल्ये नाल्यात वाहून गेली तरी चालेल, असा एकदा निरर्गल पवित्रा घेतला की सारे काही सोयीचे होते. All is fair in love and war, अर्थात ‘युद्धात आणि प्रेमात सारे काही क्षम्य आहे’, अशा अर्थाचे एक सुभाषित सोळाव्या शतकात जॉन लायली नामक कुण्या इंग्रज लेखकाने पहिल्यांदा वापरले, पण युद्ध, प्रेम यांच्या जोडीला आता राजकारणाचाही समावेश करावा लागणार. काळच तसा सोकावला आहे.