
agriculture loss compensation
अतिवृष्टिग्रस्तांना आर्थिक मदत देणे आवश्यक होते. ती दिली गेली, हे योग्यच. परंतु पॅकेजबरोबर शाश्वत उपाययोजनांच्या आखणीसाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा.
अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अखेर मदतीचा हात पुढे करताना ३१ हजार ६२८ कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. राज्याच्या अर्थचक्राला बळ देणाऱ्या शिवारावर झालेल्या ढगफुटीमुळे फक्त शेतातील पिके वाहून गेली नाहीत तर दावणीची दुभती जनावरे अन् राहते घरही कोलमडले.