
‘‘भारतीय राज्यघटना २६ जानेवारी १९५० पासून अंमलात येईल, तेव्हा राजकारणात समता निर्माण होईल. मात्र, सामाजिक आणि आर्थिक जीवनातील विषमता दूर होणार नसल्यामुळे एका विरोधाभासी समाजात आपले पदार्पण झालेले असेल,’’ याकडे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटनासभेतील शेवटच्या भाषणात लक्ष वेधले होते. राज्यघटनेमुळे देशाच्या राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समानमूल्य हे तत्त्व रुढ झाले. पण आर्थिक आणि सामाजिक विषमता मात्र हटली नाही.