कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्याची मानसिक तयारी निर्माण होणे महत्त्वाचे. ‘मॉक ड्रिल’चा उद्देश तोही असतो.
कोणतेही युद्ध कितीही म्हटले तरी केवळ लष्करी पातळीवर लढलेले युद्ध राहू शकत नाही आणि सध्याच्या काळात तर ते जवळजवळ अशक्य आहे. नागरी भागाला हानी पोचू नये, हे नीतितत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता पावलेले तत्त्व असले तरी ते कागदावर आहे. त्या तत्त्वाच्या चिंधड्या उडालेल्या आपण रोज पाहात आहोत. मग तो युक्रेनमधील विध्वंस असो वा गाझा पट्टीतील.