india pakistan cricket match
sakal
भारताचा विजय निश्चितच कौतुकास्पद; पण हा ‘पेपर’ ऑप्शनला टाकला असता तर अधिक बरे झाले असते, हे मात्र खरे.
ज्याच्या शेजारी उभेदेखील राहू नये, अशा गल्लीबोळातल्या संघाशी पंगा घेऊन कुणी खराखुरा दिग्गज क्रिकेट सितारा घरी परत आला, तर त्याला डोक्यावर घेऊन नाचावे की उपचारापुरत्या दोन-चार टाळ्या वाजवून दाद द्यावी? दुबईत रविवारी रात्री झालेल्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान्यांना उभ्या उभ्या धूळ चारत विषय ‘दी एण्ड’ केला, तेव्हा मायदेशातल्या कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची भावना नेमकी अशीच संभ्रमाची होती.