

Donald Trump India US trade deal tariff pressure analysis
sakal
अठराव्या शतकातील प्रसिद्ध फ्रेंच लेखिका गॅब्रियेल्ला बार्बो दु वीलनव यांनी लिहिलेल्या ‘ब्युटी अँड द बीस्ट’ या परिकथेची जगभर पारायणे झाली असतील. प्रत्यक्षात राजपुत्र असलेल्या, परंतु शापामुळे दैत्यात रूपांतरित झालेल्या एका भयानक दिसणाऱ्या बीस्टला ती आपल्या आंतरिक सौंदर्याने जिंकते आणि शापमुक्तदेखील करते, अशी काहीशी ती परिकथा आहे. सध्या अमेरिका नामक दैत्याने जगभरातील अनेक अर्थव्यवस्थारूपी सुंदऱ्यांचा ज्या प्रकारे छळ मांडला आहे, त्यामुळे या परिकथेचे स्मरण व्हावे. कालपरवापर्यंत स्वार्थापोटी का होईना, ‘बडे भय्या’सारखी वागणारी अमेरिका अचानक जन्माच्या दावेदारासारखी का वागू लागली, आणि तिने अनेक देशांना एकाच वेळेला वेठीला का धरले, याची उत्तरे अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यशैलीत दडलेली आहेत.