

Democracy Beyond Numbers and Economic Growth
Sakal
भिंतीवरी बारोमास लटकलेले कॅलेंडर आज बदलले. नवी दिनदर्शिका नवे दिवस घेऊन पुढ्यात उभी ठाकली. गेल्या वर्षाने काय दिले, काय कमावले, काय गमावले, याचा हिशेब करण्याची उसंत नव्या दिनदर्शिकेत नाही. कारण नवे वर्ष नवी आव्हाने घेऊन येते. नवा रस्ता. नवा घाट. नवा परिसर. नवीन स्थळ काळ. अर्थात हे सारेच सापेक्ष. प्रत्यक्षात ‘रोज रोज तेच ते’ हाच अनुभव येत असतो. पाऊणशे वर्षांपूर्वी ‘नियतीशी करार’ करुन भारतीय समाजाने लोकशाहीव्यवस्था स्वीकारली.