न्या. भूषण गवई न्यायिक सक्रियतेचे पुरस्कर्ते असले तरी कार्यपालिकेचा अधिक्षेप होता कामा नये, अशा मताचे आहेत.
सरन्यायाधीशांच्या नियुक्तीकडे नित्याची प्रशासकीय प्रक्रिया या दृष्टिकोनातून पाहिले जाते. त्यामुळे न्या. भूषण गवई यांच्या रूपाने आणखी एक मराठी माणूस या पदावर बसला, या पलीकडे या नियुक्तीत सर्वसामान्यांना रस असेलच, असे नाही. पण ते ज्या पार्श्वभूमीवर या पदावर येत आहेत, ती लक्षात घेतली तर या नियुक्तीचे महत्त्व जाणवते.