halal township
sakal
मूल्यपरंपरांचे ‘घेट्टो’करण होऊ लागते, तिथे सामाजिक विणीलाच नख लागते.
प्राचीन काळी, नदीचा सोयीस्कर काठ किंवा एखाद्या मुबलक पाणी असलेल्या तळ्याकाठी मनुष्य वस्ती उभी राहात असे. भटकंतीचे युग मागे टाकून मानव कुठेतरी स्थिरस्थावर होऊ पाहात होता, त्या युगात नद्या जीवनवाहिन्या ठरल्या. उत्क्रांतीचे टप्पे ओलांडत शहरीकरणाकडे वेगाने निघालेल्या माणसांनी नंतर रेल्वेरुळांनाच जीवनवाहिनी मानून गावे आणि वस्त्या उभ्या केल्या.