माधवीलता आणि कृष्णकमळ या दोन विलक्षण वेलींमध्ये निसर्ग, सौंदर्य, सुगंध आणि आध्यात्मिक प्रतीकांचा अद्भुत संगम दिसतो. सूर्य, ऊर्जेचा ताल, ॐकाराची शक्ती आणि दैवी प्रतीकांची अनुभूती या फुलांमधून जाणवते.
सूर्यसृष्टीचा कर्ता, करविता. त्यात प्राणतत्त्व आणून वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवसृष्टी निर्माण करून त्यात चैतन्य आणलं ते ॐकारानेच. हे चैतन्य सौंदर्य, सातत्य आणि सृष्टीचा ‘ताल’ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टिकवला तो वनस्पतिसृष्टीने.