‘वनतारा’मध्ये महादेवीला नेल्यानेच ती दूर गेली, ही जखम तिच्यावरच्या श्रद्धेतून अनेकांना झाली. यातूनच श्रद्धा, धर्मपरंपरेचा सन्मान न राखण्याविरुद्ध आंदोलनाचे हत्यार उपसले गेले.
गजराज आणि कपोत हे दोन्ही सजीव प्राचीन काळापासून भारतीय आणि अन्य अनेक संस्कृतींमध्ये अढळ स्थान राखून आहेत. मानवी साहचर्य या दोन्ही प्राण्यांना नवीन नाही. गजराज हे तर श्रद्धा आणि शौर्याचे प्रतीक, आणि कपोत म्हणजेच कबूतर हे उडते टपाल खाते! पण आज या दोन्ही सजीवांनी महाराष्ट्रातील मानवी जीवन ढवळून काढले आहे.