marathwada flood water
sakal
नैसर्गिक प्रवाह बदलले जातात, त्यामुळे नद्या, ओढ्यांची नैसर्गिक रचना मोडीत निघते. त्याचे परिणाम जागोजागी दिसत आहेत.
लहरी पाऊसमानाचा जबरदस्त फटका यावेळी मराठवाड्याला बसला आहे. त्यामुळे झालेली जीवितहानी, आर्थिक नुकसान, पशुधनाची हानी, विस्थापन हे सगळेच गंभीर स्वरूपाचे आहे. राज्यभरातील मुसळधार पावसाची दखल घेत राज्य सरकारने आतापर्यंत २२१५ कोटी रुपयांची तातडीची मदत मंजूर केली आहे.