गणिताचे अध्ययन अधिक कल्पक रीतीने, परिमाणकारकरीत्या कसे करता येईल, हे पाहणे गरजेचे आहे.
अलीकडच्या काळात शिक्षणावरची चर्चादेखील घसरत राजकारणाच्या वाटेने जायला लागली आहे. एखादी भाषा पहिलीपासून शिकवावी की नाही, यावरून महाराष्ट्रात पेटलेला वाद हे त्याचे ताजे उदाहरण.