
एकीकडे आमच्यात कोणतेही वाद नाहीत, कोणीही अडून बसलेले नाही, असे सांगायचे आणि दुसरीकडे नेतानिवडीच्या प्रक्रियेला विलंब करायचा, हा काय प्रकार आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
ताप असतानाही काळजीवाहू मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत तातडीच्या कामांसाठी बैठकी घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. गृहखात्यासाठी ते आग्रही आहेत. मात्र या ‘संक्रमणकाळा’तही कामावर त्यांनी परिणाम होऊ दिलेला नाही. त्यांचे सहकारी मात्र केवळ मागण्याच करत बसले आहेत. या मागण्यातही कुरकुरीचा भाग अधिक.