
येथे कायद्याचेच राज्य चालते, हा संदेश देण्याचे कर्तव्य आता मुख्यमंत्र्यांना पार पाडावे लागेल.
सांप्रतकाळी महाराष्ट्रप्रदेशी उल्लूमशाल राजकारण्यांचे पीक तरारुन वर आले आहे. बुध्दीच्या दैवताची अख्खे जग पूजा बांधत असताना लोकप्रतिनिधी त्यांच्या नसलेल्या अकलेचे जे दिवाळे जनतेसमोर प्रदर्शित करीत आहेत ,ते पहाता हाच का तो विवेक-वैराग्याचा महाराष्ट्र असा प्रश्न विचारण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वाटेल ते बोलायचे, विचार न करता बोलायचे याची जणू स्पर्धा लागली आहे.