
"PM Modi Finally Visits Manipur After 28 Months of Violence"
Sakal
ईशान्य भारताचा विकास हा आमच्या प्राधान्याचा विषय असेल, असे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार २०१४ला सत्तेवर आल्यापासूनच सांगत आले आहे. परंतु सरकार ‘सप्तभगिनीं’ना देत असलेले महत्त्व आणि दीर्घकाळ दुरावलेल्या या प्रदेशांला राष्ट्रीय प्रवाहाशी समरस करून घेण्याच्या हेतूंनी केलेले प्रयत्न यांच्यावर मणिपूरच्या घटनेने झाकोळ आणला आहे. तेथे दोन वर्षांपूर्वी वांशिक हिंसाचारात मैतेई आणि कुकी हे समाज होरपळून निघाले. त्या घटनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची हे समुदाय दीर्घकाळापासून प्रतीक्षा करीत होते. तो दिवस अखेर शनिवारी उगवला.