हवे ते सारेच साध्य झाले किंवा सारेच फसले, या दृष्टिकोनातून मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाकडे पाहता येणार नाही.
सामाजिक बदलाची प्रक्रिया दीर्घकालीन असते. इन्स्टाग्राम किंवा व्हॉटस्अॅपवर आवडी नोंदवाव्यात, इतकी ही प्रक्रिया उथळ नसते. त्यामुळेच अशा बदलांसाठीची आंदोलने दीर्घकाळ चालतात. आरक्षण हा भारतीय सामाजिक परिघात बदलांचा एक विषय ठरतो. बहुसंख्य भारतीय जनमानसाचा तसा विश्वास आहे, हे वास्तव आहे आणि राजकीय प्रक्रियेत ते अधिक घट्ट झाले आहे.