

Post-BMC Election Power Arithmetic
Sakal
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झालेली दिसते. ८९ जागा जिंकून भाजप मुंबईत प्रथमच सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. तर युतीमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे पक्षाला २९ जागा मिळाल्या आहेत. परिणामी २२७ च्या पालिकेच्या सभागृहात भाजपचा स्वबळावर महापौर होणे कठीण आहे. सत्तास्थापनेसाठी ११४ चे संख्याबळ गाठणे आवश्यक आहे. महायुतीने ११८ चा आकडा गाठला असला तरी ‘वरमाय’ रुसली आहे. मुंबई महापालिकेच्या सत्तेतील वाटा मिळावा, हा एकनाथ शिंदेंचा आग्रह भाजपला जरी दुराग्रह वाटत असला तरी संधीचे सोने करण्यात शिंदे माहीर आहेत.