मुंबईत मराठी माणसाचा आवाज गेल्या काही दशकात हरवत गेला तो गेलाच. आता राजकीय आवाजही क्षीण होताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत ठाकरेबंधूंनी मराठी आवाज बुलंद केला तर ते हवेच आहे.
सबगोलंकारी मुंबई महानगरीला स्वत:चा असा भाषापिंडच नाही, हे भाषापंडितांचे लाडके गृहितक. अठरापगड वस्ती असलेल्या या महानगरात ‘बम्बय्या’ नावाची एक बोली बोलली जाते, असाही शोध आधुनिक काळात लागला. बम्बय्या बोली ही अनेक बोली-भाषांचे मिश्रण आहे.