बॉम्बस्फोटप्रकरणात खंडपीठाने पोलिसांच्या तपासकामावर जी प्रश्नचिन्हे लावली आहेत, ती गंभीर आणि सर्वसामान्यांना खचविणारी आहेत.
तब्बल दीड कोटी लेकरे पोटाशी धरून महानगरी मुंबई दिवसरात्र धाव धाव धावत असते. तिला क्षणाची उसंत नाही. पूर येवो, दरडी कोसळोत, इमारती पडोत, दहशतवाद्यांचे हल्ले होवोत, रेल्वेगाड्यांत स्फोट होवोत, ती धावतच राहाते. काही रहिवासी जिवानिशी जातात, मग काही तास अडखळते, मग पुन्हा तशीच धावू लागते.