Nagpur Winter Session: Will This Year Be Any Different?
sakal
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी राजधानी मुंबई नागपुरात हलली आहे. `नागपूर करारा’ला जागत जेमतेम सात दिवसांच्या अधिवेशनासाठी करण्यात आलेला या खटाटोपातून विदर्भाच्या आणि जनतेच्या पदरात काय पडणार, हा प्रश्नच आहे. गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेता या अधिवेशनाकडे पाहण्याचा सत्ताधाऱ्यांचा आणि अनेकदा विरोधकांचाही दृष्टिकोन ‘चेक लिस्ट’ पूर्ण करण्याचा असतो. विधिमंडळाच्या पूर्वसंध्येला विरोधकांचा चहापानावरील बहिष्कार नित्याचा आणि परिणामशून्य होणे यापेक्षा व्यथित करणारी बाब हा दृष्टिकोन बदलत नाही, हा आहे.