navi mumbai airport
sakal
रस्ते, बंदरे, विमानतळ यांतून विकासाची ‘धावपट्टी’ तयार होत आहे. आता आव्हान आहे ते त्यावरून यशस्वी उड्डाणाचे.
पायाभूत सुविधा, वाहतूकविषयक संरचना यावर मोदी सरकारचा पहिल्यापासूनच भर आहे. विकासाला गती देण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात, हे खरे; मात्र तेवढेच पुरेसे नसते. त्याच्या जोडीने आर्थिक-औद्योगिक विकासाची संपूर्ण परिसंस्था उभी करावी लागते, तरच विकासाचे उड्डाण साध्य होते.