

Israel Political Developments Bring New Equations and Raise Questions About the Future of Middle East Relations
sakal
इस्राईलच्या राजकारणात सत्तांतराच्या हालचालींना आता निर्णायक वळण मिळाले आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे कट्टर विरोधक आणि माजी लष्करप्रमुख गादी आयझेनकोट यांना पुढील सरकार स्थापन करण्यासाठी अध्यक्ष इसाक हरझॉग यांनी निमंत्रित केल्याने देशातील राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. नेतान्याहू यांची दीर्घकालीन सत्ता संपुष्टात आणण्यासाठी विरोधी पक्षांनी आयझेनकोट यांच्या नेतृत्वाखाली एकजूट केली आहे. या घडामोडीमुळे इस्राईलमध्ये नव्या राजकीय पर्वाची शक्यता निर्माण झाली असून, आयझेनकोट सरकार स्थापनेत यशस्वी होणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. नेतान्याहू यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनेही हा मोठा धक्का मानला जात आहे. इस्राईलमध्ये उजव्या, डाव्या, मध्यवर्ती आणि अरब पक्षांचे राजकीय हितसंबंध वेगवेगळे आहेत. त्यामुळे या सर्वांना एका आघाडीत आणणे हे मोठे आव्हान आहे.