

Zohran Mamdani Newyork Mayor
sakal
‘‘न्यूयॉर्क हे स्थलांतरितांचे शहर आहे आणि त्यांच्याकडूनच ते चालवले जाईल’’, अशी ग्वाही देणाऱ्या झोहरान ममदानी यांची महापौरपदी निवड झाली. ट्रम्प यांच्या भूमिकेला छेद देणाऱ्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिले, ही घटना अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. निवडणुकांच्या माध्यमातून सत्ताधारी बदलता येणे, हे लोकशाहीचे सर्वांत लोभस वैशिष्ट्य असते. मात्र प्रत्येक सत्तांतर म्हणजे जणू काही क्रांतीच घडते, असे नसते. त्यातही स्थानिक पातळीवर निवडणुका होत असतील तर त्यांचे महत्त्व त्या भागापुरते मर्यादित असते.