
Maharashtra Floods
उभ्या महाराष्ट्रातला शेतकरी हंबरडा फोडत असताना मराठीची तमाम मनोरंजननगरी कुठे आहे?
स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे लोकमान्य टिळकांच्या देहावसानानंतर महात्मा गांधींच्या हाती आली, तेव्हा ‘टिळक स्वराज्य फंडा’ची कल्पना गांधीजींनी सुचवली. या निधीसाठी बालगंधर्व आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी ‘संयुक्त मानापमाना’चा ऐतिहासिक खेळ केला. ती तारीख होती आठ जुलै १९२१. या खेळातून दोघांनीही भरीव निधी मिळवून दिला.