
जगात जे सशस्त्र संघर्ष सुरू आहेत, ते थांबण्याचे नाव घेत नाहीत. याचे कारण एकतर राजकीय उद्दिष्टे स्पष्ट नाहीत किंवा असतील तर ती वास्तवाधिष्ठित नाहीत.
एकविसाव्या शतकातील अडीच दशके उलटून गेल्यानंतरही जगात शांततेची पहाट उगवू नये, हे दुःखदायक असे वास्तव आहे. अधिकाधिक शक्तिशाली शस्त्रास्त्रे तयार होताहेत. त्यामागचे तंत्रज्ञान विलक्षण वेगाने अद्ययावत होत चालले आहे. त्याची निष्पत्ती मानवी संहारात आणि वित्तहानीत होत आहे.