

Supreme Court’s Stand on Passive Euthanasia
Sakal
जेमतेम विशीच्या उंबरठ्यावरचा, बी. टेकचे शिक्षण घेणारा हरीश राणा वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरुन खाली पडला. ही घटना २०१३च्या ऑगस्टमधली. डोक्याला गंभीर दुखापती झालेला हरीश राणा मृत्यूशी झगडत राहिला. पण तो हलत नाही, बोलत नाही. कृत्रिम जीवरक्षक उपकरणांच्या इलेक्ट्रॉनिक कंपनांव्यतिरिक्त अस्तित्वाची लक्षणे दिसत नाहीत. वर्षानुवर्षे इस्पितळाच्या बिछान्यात पडून राहिल्याने आता शरीरावर क्षते पडू लागली आहेत.