मोर्चाचे सत्य

The Truth Behind the March: अनेक राजकीय पक्ष मतदारयाद्यांवर प्रश्न उपस्थित करत असतील तर त्यांच्या शंकांचे निरसन करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे.
Unmasking the March: The Real Story Behind the Agitation

Unmasking the March: The Real Story Behind the Agitation

Sakal

Updated on

मुंबईत महाविकास आघाडीने काढलेल्या मोर्चाच्या निमित्ताने राज्यातील राजकारणाच्या सद्यःस्थितीचे दर्शन झाले. मोर्चाच्या निमित्ताने का होईना या आघाडीतील घटक पक्षांमधील एकतेचा धागा दृश्यमान झाला, पण त्याचबरोबर धोरण आणि शैलीतील फरकही स्पष्ट झाला. दोन्ही ‘सेनां’बरोबर जाताना काँग्रेसचे अवघडलेपण लपून राहात नव्हते. आंदोलकांचा मुख्य रोख निवडणूक आयोगावर असताना महायुतीने मूकमोर्चा काढून अनावश्यक प्रतिक्रिया दिली. थोडक्यात राजकीयदृष्ट्या अत्यंत प्राथमिक मुद्द्यावर म्हणजे मतदारयाद्यांच्या प्रश्नांवरूनच आंदोलने करावी लागणे आणि सत्ताधाऱ्यांनीही त्याकडे केवळ राजकीय सोईच्या चष्म्यातून पाहणे ही बाब राजकीय प्रक्रियेच्या बाबतीत महाराष्ट्राचे चाचपडणे कसे चालू आहे, हे दर्शवणारी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com