ज्यांनी सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करायचे तीच मंडळी शोषणाची भागीदार बनत असतील तर सर्वसामान्य नागरिकांनी कुणाकडे न्याय मागायचा, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
फलटण येथील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या ही स्त्रियांवरील अत्याचाराची आणखी एक दुर्दैवी घटना तर आहेच; पण या घटनेचा सगळा तपशील पाहिला तर एकूणच आपल्या व्यवस्थेतील सडलेपणाचे अस्वस्थ करणारे दर्शन त्यातून घडते.