Municipal Elections and the Return of Local Democracy
sakal
निवडणुकांच्या निमित्ताने सध्या लोकशाहीचे जे दर्शन घडते आहे, त्याने या संपूर्ण व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणांशिवाय पर्याय नाही, हे ,स्पष्ट होते. राजेशाहीचा काळ मागे पडून बरीच वर्षे झाली. पण ‘राजदरबारां’त साकळलेल्या राजकीय सत्तेचे पाट वाहते झाले नाहीत; उलट राजकारणाचे वाढते दरबारीकरण नवनवी रूपे दाखवित आहे. त्यातले अलीकडच्या काळात दिसलेले रूप म्हणजे महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत आढळलेली ‘बिनविरोधा’ची लाट.