सांप्रतकाळ ‘अघोषित आणीबाणी’चा असल्याचा चुकीचा शिक्का मारणारे आजचे बहुतेक विरोधक मूळच्या आणीबाणीविषयी बोलण्यास उत्सुक नाहीत, तर आजच्या वर्तमान राजकीय परिस्थितीविषयी होणाऱ्या टीकेबाबत मूग गिळून असलेले सत्ताधारी परिवारातील सर्वजण पन्नास वर्षांपूर्वीच्या आणीबाणीच्या ‘स्मरण-मंथना’त मग्न आहेत.