आपल्या किशोरवयीन मुलांना एक व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा आहे, हे अद्यापही अनेक पालकांच्या पचनी पडत नाही.
‘गुरुजी, माझ्या मुलाला हेदेखील शिकवा की फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेले अपयश श्रेयस्कर आहे. आपल्या कल्पना, आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्याने. बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी!’ अब्राहम लिंकन यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेल्या कथित पत्रातील हा एक अंश.