

Spiritual significance of Kailaspati Nagalingam tree flowers
sakal
ओंकाराने सजीव सृष्टी निराकारातून निर्माण केली. त्यात काही अद्भुत शक्ती निर्माण झाल्या. त्यापैकी श्री गणेशाची माता (पार्वती- स्त्रीशक्ती) आणि पिता (महादेव- पुरुषशक्ती) यातून ब्रह्मांडाचा आरंभ झाला असे मानतात. या आदिशक्तीतून निसर्गाचे सृजन होते. निसर्गातल्या शक्तींची पूजा आपल्या संस्कृतीत काही चिन्हांच्या माध्यमातून करण्याची प्रथा आहे. शिवपिंडी हे त्यातील एक, जे चेतना आणि आदिम दैवी शक्तीचे प्रतीक मानतात. शिवपिंडी आणि त्यावर अलंकार म्हणून परिधान केलेल्या ‘वासुकी’ नागराजाच्या पूजेचे महत्त्व हिंदू मूर्तिशास्त्रात सांगितले आहे.