

SIR Movement in India Reaches Turning Point as Political Parties Raise Concerns Over Special Intensive Revision of Voter Lists
sakal
सुनील चावके, ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्युरोचे प्रमुख
‘एसआयआर’विरोधी आंदोलनाला आधार उरला आहे तो केवळ काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांचा. दसरा-दिवाळी-छठपूजेच्या मोसमात आंदोलकांचाही अजिबात मूड नसतो, हे यापूर्वी दिल्लीच्या राजकारणाने अनेकदा अनुभवले आहे. पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आंदोलनावर ठाम आहेत. त्यांचा हा प्रयोग त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता दाट आहे.