अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

Bangladesh Nationalist Party : गेल्या वीस वर्षांत झालेल्या प्रचंड राजकीय उलथापालथीतून बोध घेत भारत आणि बांगलादेशाला पाटी कोरी करून नव्याने संबंध स्थापित करावे लागणार आहेत.
Bangladesh Nationalist Party

Bangladesh Nationalist Party

sakal

Updated on: 

अग्रलेख 

बांगलादेशात लोकांनी निवडलेले सरकार सत्तेवर आल्याने तेथील राजकीय अस्थिरता दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला, ही केवळ त्या देशासाठीच नव्हे तर भारतासाठीही एक सकारात्मक घटना आहे. ‘बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी’ला या निवडणुकीत लौकांनी कौल दिला आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील ‘अवामी लीग’ हा एक प्रमुख पक्ष निवडणुकीच्या मैदानात नसताना झालेला हा विजय असला तरी या निवडणुकीचे महत्त्व दुर्लक्षिता कामा नये. अस्थिरतेच्या वातावरणाचा फायदा घेऊन तेथील राजकीय प्रवाहात मध्यवर्ती स्थान निर्माण करण्याच्या ‘जमाते इस्लामी’ पक्षाच्या इराद्यांना मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही, ही उल्लेखनीय बाब.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com