
Confiscated bottles of cough syrup being displayed by authorities amid rising misuse cases in Maharashtra.
Sakal
अमेरिका व युरोपसारख्या कडक नियंत्रण असलेल्या बाजारपेठांमध्येही प्रस्थापित झालेला तसेच कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना किफायतशीर किंमतीत औषधे आणि लसींचा मोठा पुरवठादार, जगातील सर्वाधिक औषधनिर्मिती आणि निर्यात करणाऱ्या देशांपैकी एक अशी औषधनिर्मिती क्षेत्रात भारताची प्रतिमा आहे. मागच्या आर्थिक वर्षात भारताने सुमारे ३० अब्ज अमेरिकन डॉलर किमतीची औषधे निर्यात केली. त्यात तयार औषधे आणि जैव-औषधांचा सर्वाधिक वाटा होता. भारताकडे औषधांच्या मूळ घटकांची निर्मितीची स्वतःची मजबूत क्षमता आहे. औषध निर्यात उत्पन्नात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे या क्षेत्रात भारतात गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगाची औषधशाळा अशी ओळख प्रस्थापित करीत असलेल्या भारताची औषध उद्योगातील ही प्रतिमा केवळ व्यावसायिकच नव्हे तर राजनैतिक दृष्टीनेही महत्त्वाची आहे.