अग्रलेख
लोकशाहीत विरोधी पक्षाचे महत्त्वही अनन्यसाधारण असते, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. परंतु महाराष्ट्र विधानसभेचा जो निकाल लागला आहे, त्यात विरोधी पक्षाच्या जागा इतक्या कमी झाल्या आहेत की, विधिमंडळात आणि बाहेरही विरोधाची भूमिका प्रभावीपणे पार पाडली जाईल का, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कमी संख्या असल्याने नियमानुसार विरोधी पक्षनेता हे अधिकृत पदही अध्यक्षांनी ठरवले तरच दिले जाऊ शकते.