

संघटित टोळ्यांनी पुन्हा आपले बस्तान बसवल्याची दुश्चिन्हे प्रकर्षाने जाणवू लागली आहेत. ही परिस्थिती उद्भवण्याचे मुख्य कारण आहे, पोलिस प्रशासनाची सैल झालेली पकड. यामागच्या कारणांच्या मुळाशी जावे लागेल.
‘गॅंग’ आणि ‘गॅंगवॉर’ हे शब्द ९० च्या दशकाच्या अखेरीस मुंबई आणि महाराष्ट्रातून अंतर्धान पावले, असे वाटत होते. पण आता पुन्हा त्या काळाची आठवण करून देणाऱ्या घटना एकापाठोपाठ एक घडताहेत. मुंबईच नाही तर पुणे, नाशिक आणि बीड अशा छोट्या शहरातही या संघटित टोळ्यांनी पुन्हा आपले बस्तान बसवल्याची दुश्चिन्हे प्रकर्षाने जाणवू लागली आहेत. ही परिस्थिती गंभीर मानली पाहिजे.