

Assembly Sessions and Their Unwritten Traditions
Sakal
दरवर्षीप्रमाणे यंदाही’ अशा गुळगुळीत उल्लेखाने सुरू होणारे काम सर्वसामान्यांच्या तिरस्कारास पात्र कसे ठरू शकते याचे सालंकृत उदाहरण म्हणून सालाबादाप्रमाणे होणाऱ्या नागपुरातील हिवाळी वा ‘हुर्डा’ अधिवेशनाकडे बघता येईल. काहीही साध्य होत नसलेल्या या अधिवेशनाचा शिरस्ता नागपूरकरांच्या एवढा अंगवळणी पडला आहे की, एखादा मोठा मोर्चा वा नियोजनशून्य कारभारामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडली तर त्याची आता फारशी कुणी दखल घेत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे गंभीरता सरून त्याला आलेले उत्सवी सोहळ्याचे स्वरूप. या सोहळ्याचा कुळाचारही ठरला आहे आणि उत्सवमूर्तीही. कुळाचाराची सुरुवात होते ती अधिवेशनाच्या कालावधीवरून.