
Zakir Hussain Musical Journey: खरे तर कुण्या एका तबलजीच्या जाण्याने सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याची लय बिघडावी, असे काही नसते. पण उस्ताद झाकिर हुसेन यांचे अचानक मैफलीतून उठून जाणे, तमाम संगीत रसिकांसाठी वेदनादायी ठरले. संगीताचा आत्माच जणू हरपल्याची भावना झाली आहे.