Social Media
sakal
‘सोशल मीडिया’ हे साधन आहे; साध्य नव्हे. आणि जेव्हा साधन आपल्या मनावर राज्य करू लागते, तेव्हा थांबून विचार करण्याची वेळ येते.
डोळ्यांसमोर उजळणारा स्क्रीन, अंगठ्याच्या हलक्याशा स्पर्शाने उघडणारे आभासी जग आणि त्या जगात हरवत जाणारे बालपण, हे आजच्या जगाचे वास्तव आहे. संवादाच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या या ‘आभासी विश्वा’ने मानवी मनाला वेढून टाकले आहे. हा वेढा मुलांना व्यसनाधीनतेकडे घेऊन चालला आहे. यातून जे आयुष्यभराचे नुकसान होते, त्याला जबाबदार कोण, या प्रश्नाचे एक उत्तर नुकतेच मिळाले.