
नेमेचि येते हिवाळी अधिवेशन, तसे अधिवेशन आले आणि गेलेही. हे अधिवेशन कशासाठी झाले, या प्रश्नाने अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत. ‘मंत्रिमंडळ विस्तारासाठी हे अधिवेशन झाले न बे’, असे नागपुरी उत्तर देत कुणी आपलेच समाधान करून घेत आहे. ज्यासाठी नागपुरात अधिवेशन व्हावे, असे संकेत आहेत, त्यावर या अधिवेशनात खरेच काम झाले का, याचे ठोस उत्तर मात्र सहसा कुणाला देता येईल, असे वाटत नाही.