bhyrappa
sakal
भुईमुगाच्या शेंगेप्रमाणे भैरप्पा यांच्या लेखनकृती कानडी मातीत लगटूनच भुईतून वर आल्या. तरीही त्यातल्या वैश्विक जाणीवांमुळे त्या सर्वांच्याच झाल्या.
अनेक पाखरांची कोटरे, आले-गेलेले पशुपक्षी प्रतिपाळणारा, कोट्यवधी सूक्ष्म कीटकांचा पोशिंदा असलेला, स्वत:च एक परिसंस्था बनून गेलेला, शेकडो वर्षे जुना वटवृक्ष एक दिवस मूकपणाने धराशायी झाल्यावर अवघे रान पोरके होते, तशीच अवस्था भारतीय साहित्यविश्वाची झाली असेल. संतेशिवर लिंगणय्या भैरप्पा यांचे देहावसान काही अकाली म्हणता यायचे नाही.