या जगण्यावर... अर्थपूर्ण जगण्यासाठी ‘ऐकणं’ महत्त्वाचे

आपण निदान आपला आतला आवाज तरी नीट ऐकावा.
Listening
Listening File Photo

एका स्नेह्यांच्या मुलीची एका प्रख्यात चॅनेलवरच्या गाण्याच्या कार्यक्रमात निवड झाली. विशिष्ट गाणं आणि प्रशिक्षक मिळावा म्हणून सगळे पालक तिथल्या समन्वयकापाशी भुणभूण करायचे. निर्णय त्याच्या हातात नसला तरी हा चतुर समन्वयक सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यायचा. चौकशा करणाऱ्यांना ‘बघून सांगतो हं’ आणि तक्रार करणाऱ्यांना ‘सांगून बघतो हं’ एवढी दोनच उत्तरं अगदी गोड हसून द्यायचा. नाहीतरी बऱ्याचदा बोलणाऱ्याला फक्त त्या क्षणी आलेला राग, उद्वेग किंवा नैराश्य व्यक्त करायचं असतं. प्रत्युत्तराऐवजी आपलं ऐकून घ्यावं एवढीच त्याची अपेक्षा असते. आपण मात्र अनेकदा एखादी व्यक्ती याच अपेक्षेने आपल्याला काही सांगू लागली की, त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत ‘हे तर काहीच नाही...आमच्याकडे तर...’ वगैरे बोलून, सांगणाऱ्यावर नकळत कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो. (Ya Jagnyavar listening is important for a meaningful life article by Mohini Modak)

Listening
पुणे : दहा महिन्यांच्या वेदिकाला उपचारांसाठी १६ कोटींचा खर्च!

’तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका। अनुभवेंविण नका वाव घेऊं॥’ पण सोशल मीडियाच्या कृपेने पृथ्वीतलावर बोलणाऱ्यांची तोबा गर्दी झाली आहे. ऐकण्याची, समजून घेण्याची क्षमता मात्र मंदावली आहे. एकदा एकाने आपला केक खातानाचा फोटो सोशल मीडियावर टाकला आणि सोबत ’आज माझा वाढदिवस नाही, किती जण हे नीट वाचतात ते पाहण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे,’ अशी पुस्ती जोडली. अपवाद वगळता बहुतेक प्रतिक्रिया ’वाढदिवसाच्या शुभेच्छा’ देणाऱ्याच होत्या. दुसऱ्या बाजूला, सध्याची विदारक परिस्थिती लक्षात घेता अनेक जण ‘माझ्याशी केव्हाही मोकळेपणाने बोला,’ असं आवाहन सोशल मीडियावर करताना दिसतात. त्यांचा हेतू उदात्त असतो. पण भावनिक शेअरिंगसाठी आभासी जगापेक्षा प्रत्येकाला जवळच्या व्यक्तीचा वेळ, लक्ष आणि सहस्पंदन अपेक्षित असतं. स्त्रियांच्या बाबतीत समाजपुरुष सोयीनुसार आणि बहुतेक वेळा, स्वत:ला हवं तेवढंच ऐकत आलेला आहे.

Listening
हरयाणा : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज

समोरचा माणूस कंटाळवाणं, निरर्थक बोलत असेल तर गोष्ट वेगळी. एरवी चांगला श्रोता ही आता दुर्मिळ प्रजाती होऊ लागली आहे. काही जण तर समोरचा बोलत असताना मोबाईल स्क्रोल करत त्याला ‘तुमचं चालू द्या’ अशी खूण करतात. स्क्रीनमध्ये नजरा गाडलेली तरूणाई संवादकौशल्याला मुकते आहे. नजरेला नजर देऊन ऐकणं हे त्यात आलंच. स्क्रीनवरच्या शब्दचित्रांच्या महापुरात वाचलेल्या, ऐकलेल्या एखाद्या विशेष मुद्द्यापाशी थबकून तो मनात मुरवत त्या आकलनाचा आनंद घेणं अवघड होत चाललं आहे. परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी हे जसे वाणीचे टप्पे आहेत, तसे लक्षपूर्वक ऐकणं, बोलणाऱ्याच्या भावनिक पातळीवर जाऊन श्रवण मग मनन हे ऐकण्याचे टप्पे. हे टप्पे समजून घेतले तर आपलं श्रवणकौशल्य विकसित होईल. बरं, पण ते विकसित करून करायचं काय, याचं उत्तर ’व्हर्जिन’ या जगप्रसिद्ध उद्योगसमूहाचे संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन देतात. त्यांच्या आत्मिक आणि व्यावसायिक प्रगतीचं श्रेय ते स्वत:च्या श्रवणकौशल्याला देतात.

Listening
'हमास' प्रमुखाच्या घरावर बॉम्ब हल्ले; इस्रायलची मोठी कारवाई!

ऐकून घेणाऱ्याबद्दल लोकांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण होते. फक्त व्याख्यातेच नव्हे, सफाई कामगारापासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाजवळ सांगण्यासारखं काही ना काही असतं. ते ऐकत असताना अनुभवाचं नवं विश्व उलगडत जातं. वेगळा दृष्टिकोन मिळू शकतो, अंतर्दृष्टी गवसते. केवळ यशस्वी होण्यासाठी नाही तर अर्थपूर्ण जगण्यासाठीही लक्षपूर्वक ऐकणं आणि शिकत, पुढे जात राहणं आवश्यक असतं. कान देऊन ऐकणारी व्यक्ती आयुष्यात कमी चुका करते आणि व्यवसायात तर या क्षमतेचा खूप उपयोग होतो, असं ते म्हणतात.

Listening
सातव यांना पोस्ट कोविड न्यूमोनिया; रुग्णालयाचं स्पष्टीकरण

तुम्हाला जर कुणाचंच ऐकण्यात रस नसेल तर तुमचं ऐकण्यात जगालाही रस वाटणार नाही इतकं हे साधं समीकरण आहे. आपण निदान आपला आतला आवाज तरी नीट ऐकावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com