चुहे की दहाड! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
Thursday, 21 February 2019

वझीर-ए-आजम-ए-हिंद जनाब मोदीसाहब को नाचीज इमरान का तहेदिल से सलाम. बहोत दिवसात आपली मुलाकात झाली नाही. बातचीत का रास्ता पुरा बंद झाल्याचे ध्यानात आल्यावर आखरी उपाय म्हणून मी ‘रेडिओ पाकिस्तान’वरून मेरी ‘दिल की बात’ आपल्यासमोर ठेवत आहे. आपल्यासारखा ‘दिल की बात’ हा रेडिओ टॉक करण्याचे मी ठरवले होते, लेकिन आमच्या लष्कराने त्याचे नाव बदलून ‘दिल की भडास’ असे ठेवा, असे सुचवले. जाने दो जनाब, आपल्याशी बातचीत करण्यासाठी माझा दिल तरसत आहे, हे मी कुठल्या जुबांमध्ये सांगू? आपणच माझे स्थान-ई-प्रेरणा आहात. एक चायवाला वझीरेआझम बनू शकतो, तर एक फास्ट बोलर का नाही?

वझीर-ए-आजम-ए-हिंद जनाब मोदीसाहब को नाचीज इमरान का तहेदिल से सलाम. बहोत दिवसात आपली मुलाकात झाली नाही. बातचीत का रास्ता पुरा बंद झाल्याचे ध्यानात आल्यावर आखरी उपाय म्हणून मी ‘रेडिओ पाकिस्तान’वरून मेरी ‘दिल की बात’ आपल्यासमोर ठेवत आहे. आपल्यासारखा ‘दिल की बात’ हा रेडिओ टॉक करण्याचे मी ठरवले होते, लेकिन आमच्या लष्कराने त्याचे नाव बदलून ‘दिल की भडास’ असे ठेवा, असे सुचवले. जाने दो जनाब, आपल्याशी बातचीत करण्यासाठी माझा दिल तरसत आहे, हे मी कुठल्या जुबांमध्ये सांगू? आपणच माझे स्थान-ई-प्रेरणा आहात. एक चायवाला वझीरेआझम बनू शकतो, तर एक फास्ट बोलर का नाही? असे माझ्या मनात आल्यानेच मी सियासतमध्ये उडी घेतली. मी एक अच्छा फास्ट बोलर असल्याने अवामनेही मला निवडून दिले. आपल्यासारखेच मलाही माझ्या मुल्कात अच्छे दिन आणायचे होते. आपण हिंदोस्तांमधली महंगाई कमी केलीत असे ऐकतो! मीसुद्धा आमच्या मुल्कात बंदुका, बंदुकीच्या गोळ्या, आर्डिएक्‍स, हॅंडग्रेनेड आदी जीवनावश्‍यक वस्तूंवर मी कंप्लिट टॅक्‍स माफ करून टाकला आहे.

जनाब, मी एक साधासुधा सिंपल फास्ट बोलर होतो. क्रिकेट खेळण्यासाठी मी आपल्या मुल्कात हमेशा येत असे. आमच्या क्रिकेट टीममध्ये एकसे एक सुरमा खिलाडी होते. पण तेव्हा मी बॉल टाकत असे, आता बॉम्ब टाकणे अंगवळणी पडले आहे! खैर, आमच्या क्रिकेट टीमची हालत सध्या दुरुस्त नाही, और मुल्क की हालत क्‍या बयां करू? जैसा हमारा क्रिकेट वैसाही मुल्क! मी सूत्र-ई-पाक स्वीकारल्यानंतर आपण मला बुलावा धाडाल, असे फार वाटले होते. लेकिन...वो हो न सका. अब न रहे वो अरमान...जाऊ दे. माझ्याऐवजी मी काही जवान तुमच्या मुल्कात अधूनमधून पाठवत असतो. ते काश्‍मीरमध्ये जाऊन दो-चार दिन राहून येतात. आमचे लष्कर त्यांना (हिफाजत के तौरपर) थोडाफार दारूगोळा आणि बंदुका वगैरे फ्री देते. त्यांना तुम्ही दहशतवादी का म्हणता? त्यांची तुम्ही बखुबी खातिरदारी कां करत नाही?
मोठ्या आवाजात : आमच्या मुल्कात फौज घुसवून स्ट्राइक-ए-सर्जिकल फिर एकबार करावा, अशी बात हिंदोस्तांमध्ये चालू असल्याचे कळले. आमच्याशी लडाई छेडण्याची कुरापत करू नका, हम जैसे को वैसा जबाब देंगे (हळू आवाजात : बुरा ना मानो जनाब, हे वाक्‍य आमच्या चीफ-ए-लष्कर ह्यांनी लिहून दिले असून, एक आयएसआयचा एजंट मागल्या बाजूला उभा आहे! समझ लो मेरी मजबुरी!!) आमच्या दहशतगर्दांनी तुमच्या मुल्कात कितीही बॉम्ब फोडले तरीही यकीन माना की, हिंदोस्तांबद्दल माझ्या दिलात खूप प्यार आहे. आपल्याबद्दलही माझ्या दिलात खूप खूप प्यार आहे और क्‍या कहूं?
आपल्या दिलात जागा मिळवण्यासाठी मी काय केले नाही? मेरा अपना हिंदोस्तानी अजीज दोस्त और शहंशाह-ए-हंसीमजाक जो की सिद्धूप्राजी ह्यालाही मी सांगून पाहिले की ‘‘पाजी, तुस्सी तो ग्रेट हो! कुछ भी कर, और मोदीसाहब को मना ले!’’ तर त्याने आंखे गरागरा फिरवून मला शेर ऐकवला. तो असा :
‘‘ हुजूर...जो नहीं नसीब, उस की क्‍यूं कीजे आस,
छाछ पिया जाये, गर हो दूध की प्यास!’’
ठोको ताली!!
...मी ताली ठोकली (इलाजच नव्हता!) सध्या दिवस खराब असल्याने मला सिद्धूप्राजीला झेलणे भाग आहे. जाने दो.  
आपका अपना इम्रान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article