‘रागा’ आणि पुणे! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 6 एप्रिल 2019

सांप्रतकाळी इये देशी इलेक्‍शनप्रीत्यर्थ मुलाखतीचे पेव फुटले असून, आमच्यासारख्या दाखलेबाज मुलाखतकाराला फुर्सत म्हणून उरलेली नाही. सध्या आम्ही इतक्‍या मुलाखती घेऊन ऱ्हायलो आहोत की आमच्यावर जळ जळ जळून काही (पुण्यातल्या) नामवंत मुलाखतकारांनी (पक्षी : सुधीर्जी गाडगीळ) आमच्याशी सध्या बोलणेच टाकले आहे. पण आमचा नाइलाज आहे. दर एक दिवसाआड कुठल्या ना कुठल्या मुलाखतीची सुपारी आलेली असत्ये. महाराष्ट्राचे (आणि अर्थातच) आमचे मा. उधोजीसाहेब ह्यांच्या म्यारेथॉन मुलाखतीनंतर आम्ही प्रचंड गाजलो. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचे (आणि अर्थातच आमचेही) लाडके कारभारी जे की मा.

सांप्रतकाळी इये देशी इलेक्‍शनप्रीत्यर्थ मुलाखतीचे पेव फुटले असून, आमच्यासारख्या दाखलेबाज मुलाखतकाराला फुर्सत म्हणून उरलेली नाही. सध्या आम्ही इतक्‍या मुलाखती घेऊन ऱ्हायलो आहोत की आमच्यावर जळ जळ जळून काही (पुण्यातल्या) नामवंत मुलाखतकारांनी (पक्षी : सुधीर्जी गाडगीळ) आमच्याशी सध्या बोलणेच टाकले आहे. पण आमचा नाइलाज आहे. दर एक दिवसाआड कुठल्या ना कुठल्या मुलाखतीची सुपारी आलेली असत्ये. महाराष्ट्राचे (आणि अर्थातच) आमचे मा. उधोजीसाहेब ह्यांच्या म्यारेथॉन मुलाखतीनंतर आम्ही प्रचंड गाजलो. त्यापाठोपाठ महाराष्ट्राचे (आणि अर्थातच आमचेही) लाडके कारभारी जे की मा. नानासाहेब फडणवीस ह्यांचीही मुलाखत आम्हाला घ्यावी लागली. त्या मुलाखतीनंतर आम्ही गरम पाण्याच्या गुळण्या करून घसा शेकत असतानाच आम्हाला थेट दिल्लीहून निरोप आला, की प्रत्यक्ष आदरणीय राहुलजी ऊर्फ रागा (तुमच्या) पुण्यात येत असून, त्यांची तांतडीने मुलाखत घेणेचे करावे. आम्ही गरम पाण्याच्या गुळण्या ताबडतोब थांबवून लिंबूसरबत मागवले.

ह्या ऐतिहासिक मुलाखतीसाठी आमच्यासोबत (सहायक म्हणून) महाराष्ट्राचे अव्वल बायोपिक अभिनेते माष्टर सुबोध आणि रेडिओष्टार मा. मलिश्‍काताई ह्यांना दिमतीस देण्यात आले होते. मा. सुबोध ह्यांची उंची (त्यातल्या त्यात) बरी असल्याने त्यांनी कार्यक्रमाचे शेवटी सामूहिक सेल्फी घेणे बरे पडेल, अशी योजना झाली होती. तथापि, सेल्फी स्वत: मा. रागा ह्यांनीच घेतली, हे विशेष. पुन्हा असो. मा. सुबोध ह्यांनी काही सुबोध प्रश्‍न विचारून सुरवात चांगली केली. मा. मलिश्‍काताईंच्या नावातच ‘का’ असल्याने त्या दरवेळी ‘असं का?’ असे विचारत होत्या.
आम्ही घेतलेली ‘रागा’ ह्यांची ही मुलाखत जगभर प्रचंड गाजली, हे वेगळे सांगावयाची गरज नाही. मुळात मुलाखत झाली पुण्यात... ती गाजायचीच! पुण्याच्या तरुणाईशी संवाद साधण्याच्या ह्या संधीचे मा. राहुलजींनीही सोने केले. तथापि, पुण्यातील तरुणाचे मानसिक वय सर्वसाधारणपणे सव्वाशे वर्षे असते, हे त्यांना आधी कसे कळणार? परंतु मा. सुबोध ह्यांच्यामुळे त्यांना ते नीट कळले. असो.

मुलाखत काहीच्या काहीच खेळीमेळीची झाली. मुलाखतीसाठी (किमान) दोन खुर्च्या ठेवण्याची पद्धत असते, पण हा पुण्यातील तरुणाईशी संवाद असल्याचे सांगून संयोजकांनी खुर्च्यांना च्याट दिली होती. संपूर्ण मुलाखत आम्ही उभ्याने घेतली, ह्याची नोंद व्हावी!!
आम्ही     : पुण्यात कसं वाटतंय?
रागा     :     खूप छान वाटलं! (हे वाक्‍य मा. सुबोध ह्यांनी         घोटवून घेतलेले होते. टाळ्या!)
आम्ही : (अभिमानाने) पुण्यात काय नाही?
रागा     : पार्किंग! एक तास शोधत होतो! नाही मिळालं!!  
आम्ही     : तुमची पुढली योजना काय आहे?
रागा     : मा. सुबोध ह्यांचं बायोपिक करायला मला आवडेल! कारण मी त्यांच्यासारखाच दिसतो! (प्रचंड टाळ्या! इथे मा. सुबोध लाजतात...)
आम्ही : नमोजी आणि तुमचं येवढं काय हो वाकडं?
रागा     : छे, कुठे काय आहे! त्यांच्याबरोबर मी ‘रूपाली’वर चहा घ्यायला किंवा ‘वाडेश्‍वर’वर अप्पे खायलाही तयार आहे!! पण बिल कोण भरणार, त्यावर अडलंय!! (हशा!)
आम्ही     : (थेट पुणेरी तरुणाई स्टायलीत) रोजगाराची समस्या हल्ली भयंकर उग्र झाली असून, त्याबद्दल सगळेच बोलत आहेत. पण इथे प्रचंड शिकूनही पगार धड आणि वेळेवर मिळत नाहीत, त्यांचं काय? दहा-पंधरा हजार पगारावर इंजिनिअरनं काम करावं काय? बोला!!
रागा    : (अस्सल पुणेरीच उत्तर देत) हो ना! मग बोला काय? तुम्हीच बोला!!
तात्पर्य     : मा. रागा ह्यांना पुण्याचे नागरिकत्त्व मिळण्यास हरकत नाही!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article