ढिंग टांग : बुआ आणि बबुआ!

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 6 जून 2019

आदरणीय बुआ सप्रेम प्रणाम, आपकी बहुत याद सता रही है. तुझ्या घरी मे महिन्याची सुटी चांगली गेली. आता पुन्हा शाळा सुरू होणार. म्हटले, त्या आधी तुला एक छोटेसे खत लिहून टाकावे! उन्हाळ्याच्या सुटीत तू कुठे जाणार? असे मला शाळेतले मित्र विचारत होते, तेव्हा मी अभिमानाने ‘मैं मेरी बुआ के घर जा रहा हूँ’ असे सांगत होतो. बुआ, तू तर माझ्या पिताजींची बहीण! पण तुमच्यात झगडा आहे, हे मला कसे समजणार? जेव्हा मला आपले पारिवारिक नाते कळले तेव्हा मी हुरळून गेलो. बुआकडे एकदा तरी राहायला जायचेच, असे मी पिताजींना सांगितले. (त्यांनी ओठांची भेदक हालचाल केली, पण) विरोध केला नाही.

तुझे नाव काढले की आमचे पिताजी नाक मुरडतात आणि ओठांची भेदक हालचाल करतात. त्याचा अर्थ मला कळत नाही. ‘‘बुआचे नाव घेतले की तुम्ही काय पुटपुटता?’’ असे मी त्यांना एकदा विचारलेदेखील... पण ‘तू मोठा झालास की तुला अर्थ समजेल’ असे ते म्हणाले. जाऊ दे.
तुझ्यासोबतच्या मुक्‍कामात मी हत्तीवरून सवारी केली. हत्तीच्या नेहमी मागून चालावे. पुढून चालणे डेंजर असते, हे मला कळले. यापुढे मी कधीही हत्तीच्या पुढून चालणार नाही, असे वचन देतो; पण तू मला अव्हेरू नकोस ना बुआ!! मला खूप वाईट वाटले.
हाथी चलत है अपनी चाल
पीछे चले न कोय
हाथी पंक्‍चर होत है,
साइकिल टूटन होय!

...बुआ, कसा आहे माझा दोहा?... आपण दोघे मिळून उत्तर प्रदेशात इतिहास घडवणार होतो ना? काय झाले त्याचे? इतिहास घडवण्यासाठी आपण तुझा हत्ती आणि माझी सायकल ह्यांचे गठबंधन केले. कधी हत्ती सायकलवर बसला, तर कधी सायकल हत्तीच्या पाठीवर ठेवली. पण घडले उलटेच! हत्ती चीची करत पळाला, आणि सायकलची तर हवाच गेली. ‘बबुआशी आता पारिवारिक संबंध राहतील; पण आम्ही एकत्र येणार नाही,’ असे जाहीर करून काय मिळवलेस बुआ? आता हिवाळ्याच्या सुटीत मी कोणाकडे जाऊ?
कळावे.
सदैव तुझाच. बबुआ (अखिलेश)
* * *
मेरे प्राणप्रिय बबुआ, अनेक सुभासीर्वाद. रागावू नकोस. मीसुद्धा तुझ्यावर रागावलेली नाही. तू हिवाळ्याच्या सुटीतही माझ्या घरी ये. पण आता आपले गठबंधन नाही. म्हंजे रिश्‍ता वही, गठबंधन नहीं! कळले? तुझ्यामुळे मला पारिवारिक रिश्‍त्यांचा अनुभव मिळाला. पण तुझ्या नतद्रष्ट समाजवादी कार्ट्यांनी प्रेम दिले, मते मात्र दिली नाहीत!! हे सारे तुझ्यामुळे नव्हे, तर तुझ्या पिताजींमुळे आणि माझ्या भावामुळे झाले.
तुझे पिताजी आणि माझे पूर्वी बरे नव्हते; कारण त्यांच्या प्रॉपर्टीवर माझा डोळा आहे, असा त्यांना संशय होता. मी त्यांची जमीन हडपली, असे त्यांना वाटत होते. पण मी माझी संपत्ती स्वत: कमावली आहे. ती (त्यांच्यापेक्षा) जास्त झाली म्हणून तुझ्या पिताजींनी तुला माझ्याकडे पाठवले. बुआशी गठबंधन केले की बुआची संपत्ती आपल्या पोराला मिळेल, असा त्यांचा होरा असावा. पण मी सर्वांचे बारसे जेवलेली आहे!!
बुआ कहत है बबुआ से
छोडो हाथी साथ
साइकील की चैन संभालो
गिर गिर जावें दांत!
...हा दोहाही पाठ करून ठेव! बाकी सर्व क्षेम.
आपकी अपनी बुआ (मायावती)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial dhing tang british nandi article