ढिंग टांग : वाघांचा वाढता वसा!

dhing tang
dhing tang

स्थळ : मातोश्री वनविश्रामगृह, वनक्षेत्र वांद्रे सर्कल.
वेळ : ...तशी आरामाचीच. काळ : (गुहेत) पहुडलेला.
पात्रे : व्याघ्रसम्राट उधोजीसाहेब आणि तेजतर्रार चि. विक्रमादित्य.
.......................
विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर... बॅब्स, मे आय कम इन?
उधोजीसाहेब : (बंदूक साफ करत) नोप... मी कामात आहे!
विक्रमादित्य : (आश्‍चर्यानं) तुम्ही बंदूक क्‍लीन का करताय? शिकारीला निघाला आहात की काय?
उधोजीसाहेब : (संतापाने) खामोश! ह्या मुंबईतील अरण्यात शिकारीला मनाई आहे! हे वाघांचं अभयारण्य आहे, मिस्टर!
विक्रमादित्य : (पॉइण्टाचा मुद्दा काढत) देन व्हाय कॅरी बंदूक?
उधोजीसाहेब : (समजूत घालत) हे जंगल आहे... जंगल! इथं पावलापावलावर धोका असतो! हाताशी बंदूक असलेली बरी!
विक्रमादित्य : (कळवळ्याने) खरा वन्यप्रेमी हातात बंदूक नव्हे, दुर्बीण घेऊन जंगलात जातो!!
उधोजीसाहेब : (खेकसून) वाघ अंगावर आला म्हंजे कळेल!!
विक्रमादित्य : (खांदे उडवत) वाघ आला तर बंदूक फेकून पळायचं की दुर्बीण फेकून... एवढाच तर प्रश्‍न उरतो! मला वाटतं, त्या कामात दुर्बीण सोपी पडावी!!
उधोजीसाहेब : बंदूकच सोपी पडते! मी सांगतो ना!!
विक्रमादित्य : (विषय बदलत) बॅब्स... मला सांगा, आपल्या आरे कॉलनीतल्या अभयारण्यात किती वाघ आहेत?
उधोजीसाहेब : (बोटं मोडत) एक, दोन, तीन... चार... अठरा तरी असतील!
विक्रमादित्य : माझ्याकडे पण दहा पेंग्विन आहेत!!
उधोजीसाहेब : (तुच्छतेने) पेंग्विन राहू दे रे... वाघ आपल्यासाठी महत्त्वाचा! महाराष्ट्राचा वाघ म्हटलं की शत्रू कसा चळाचळा कापतो! पेंग्विनला बघून कोण घाबरतो? हॅ:!!
विक्रमादित्य : (गंभीरपणे) मेरे पेंग्विन को कुछ मत बोलो!
उधोजीसाहेब : (अभिमानाने) आरे कॉलनीचं काय घेऊन बसलास, ह्या मुंबईत लाखो वाघ आहेत, लाखो! आणि दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत!
विक्रमादित्य : (आश्‍चर्याने कोलमडत) लाखो वाघ? यू मीन मिलियन टायगर्स?
उधोजीसाहेब : (बंदूक रोखत) करेक्‍ट!! वन विभाग आणि मन विभाग एकत्र आले की असा चमत्कार होणारच! महाराष्ट्रावर आमची सत्ता आली आणि आम्ही काय करून दाखवलं बघ!!
विक्रमादित्य : (गोंधळून) काय करून दाखवलं?
उधोजीसाहेब : (गर्वाने) वाघांची संख्या वाढवून दाखवली की नाही!! एवढे वाघ होते का आधीच्या सरकारच्या वेळी!! (नाराजीनं) वाघांकडे कोणी ढुंकून बघत नव्हतं! आता लोक मुंबईत येतायत वाघांचे कळपच्या कळप बघायला! हे कोणामुळे झालं? आमच्यामुळेच ना!!
विक्रमादित्य : (काडी टाकत) ते सुधीर्जी मुनगंटीवर अंकल म्हणत होते की वनमंत्री म्हणून मीच हे करून दाखवलं! तुम्ही म्हणताय तुमच्यामुळे झालं, ते म्हणतात माझ्यामुळे वाघ वाढले! कोणाचं खरं मानायचं?
उधोजीसाहेब : (संतापाने) त्यांचं काहीही ऐकू नकोस! ते वाघांच्या संख्येत फायबरचे वाघही मोजतात!!
त्यांनी फार तर झाडंबिडं लावली असतील! वाघ आम्हीच वाढवले!! थोडे दिवस थांब, ह्या संपूर्ण मुंबईत वाघच वाघ दिसतील! कोस्टल रोडवर वाघ हिंडताना मला बघायचे आहेत!! लोकलच्या डब्यात, बेस्टच्या बसमध्ये वाघ बसले पाहिजेत! टॅक्‍सीतून एक पंजा काढत रुबाबात बसलेला वाघ मला बघायचा आहे!! मी वाघांचा रक्षक आहे, रक्षक! कळलं? जा आता!!
विक्रमादित्य : (हाताची घडी घालून विचारपूर्वक...) मला एक प्रश्‍न पडलाय!! विचारू?
उधोजीसाहेब : (ंबंदूक हाताळत) नको... मी कामात आहे!!
विक्रमादित्य : (हट्टाने) एवढे प्रचंड वाघ मुंबईत झाले तर आपण नेमकं काय करायचं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com