

Gattari Amavasya
Sakal
आज गतहारी अमावस्येचा पवित्र दिवस. उद्यापासून श्रावण मासारंभ होत आहे. ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिर्वळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवें, क्षणात फिरुनी ऊन पडे’ असे वर्णन बालकवींनी करून ठेवलेच आहे. आपणही तसाच श्रावण मनीमानसी अनुभवावा. रस्त्यातून जाताना खड्ड्यात पाय गेला तरी हर्ष मानसी बाळगावा. श्रावण मास हा व्रतवैकल्यांचा मास. या मासात मांसमच्छर न खाल्यास खासे पुण्य लागते. तथापि, हे पुण्य पदरी बांधावयाचे असेल तर त्याआधी गतहारीचे व्रत अंगिकारावे लागते. हे फार्फार कठोर असे व्रत आहे. ज्याला जमले, त्याचा बेडा पार झालाच म्हणून समजावे.