कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे औषधांना सुटी

महेश बर्दापूरकर
Wednesday, 8 January 2020

शरीरात रोपण केलेली स्मार्ट उपकरणे ही येत्या काही वर्षांत खूप आश्‍चर्याची गोष्ट राहणार नाही. ही उपकरणे संबंधित अवयवांचे कार्य सुधारण्यास मदत करतील, त्याचबरोबर अगदी हृदयविकार व मधुमेहासारख्या आजारांवरील गोळ्या तोंडावाटे घेण्यापासूनही सुटका करतील! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून औषधांना सुटी देण्यासाठी संशोधक प्रयत्नशील आहेत. आधुनिक पेसमेकरबद्दल तुम्ही ऐकले असेलच.

शरीरात रोपण केलेली स्मार्ट उपकरणे ही येत्या काही वर्षांत खूप आश्‍चर्याची गोष्ट राहणार नाही. ही उपकरणे संबंधित अवयवांचे कार्य सुधारण्यास मदत करतील, त्याचबरोबर अगदी हृदयविकार व मधुमेहासारख्या आजारांवरील गोळ्या तोंडावाटे घेण्यापासूनही सुटका करतील! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून औषधांना सुटी देण्यासाठी संशोधक प्रयत्नशील आहेत. आधुनिक पेसमेकरबद्दल तुम्ही ऐकले असेलच.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काडेपेटीपेक्षा छोट्या आकाराचा हा पेसमेकर रुग्णाचे हृदय कायम व व्यवस्थित धडधड करीत राहील, याची काळजी घेतो. जगातील सुमारे सव्वा कोटी रुग्ण त्याचा वापर करत आरोग्यपूर्ण आयुष्य जगत आहेत. खरेतर, पहिल्या पेसमेकरचे रोपण मध्येच झाले व त्यानंतर त्याच्याकडून हृदयासंबंधितच काम करून घेतले गेले, मात्र त्याच्याकडून अनेक कामे करून घेता येतील, असे संशोधकांच्या लक्षात आले. यामध्ये एखाद्या रोगाच्या लक्षणांवर लक्ष ठेवणे व त्याचे निदान करणे, जुने आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत करणे व त्याचबरोबर स्मार्ट फोनवर एखाद्या ॲपप्रमाणे डाउनलोड करता येईल, अशी उपचारपद्धतीही विकसित करता येणे शक्‍य आहे. 

पेसमेकरसारखे दिसणारे उपकरण शरीरातून फिरणाऱ्या सर्व मज्जातंतूंच्या जाळ्यामध्ये प्रवेश करून मधुमेह, संधिवात आणि पार्किनसन्ससारख्या आजारांवर उपचार आणि वेदनांवर नियंत्रणही मिळवता येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) वापर करून पेसमकर हृदयाच्या ठोक्‍यांबरोबरच अनेक गोष्टींवर नियंत्रण मिळवू शकेल. ‘हृदयाची अनियमित गती असणाऱ्यांसाठी पेसमेकरने खूप मोठे काम केले आहे, मात्र ते उच्च रक्तदाब किंवा शरीरातील इतर जुन्या आजारांसंदर्भात काहीही करीत नाहीत. त्यामुळे पेसमेकर अधिक कार्यक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’ असे ‘बायोस’ या ‘बायोमेडिकल स्टार्टअप’चे सहसंस्थापक ऑलिव्हर आर्मिटेज सांगतात. खरेतर मानवी शरीरात त्याचे स्वतःचेच पेसमेकर असते.

‘बायोलॉजिकल वायर्स’ नावाने ओळखले जाणारे मज्जातंतूंचे जाळे इलेक्‍ट्रिकल व त्याबरोबर रासायनिक संदेश पाठवत असतात. त्यातून शरीरात होणाऱ्या बिघाडांची माहितीही मिळत असते. डीप ब्रेन स्टिम्युलेटर आणि न्यूरोस्टिम्युलेशन या प्रकारात मोडणारी उपकरणे सध्या काही आजारांवरील उपचारांसाठी वापरली जात आहेत. मात्र, रोपण केलेली बायोइलेक्‍ट्रिक उपकरणे मानवी शरीरातील काही महत्त्वाच्या बदलांची नोंद घेण्यात अयशस्वी ठरतात. याचे कारण म्हणजे, शास्त्रज्ञांना ‘न्यूरल बायोमेकर्स’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या न्यूरल सिग्नल पॅटर्नला ओळखण्यात अपयश येत आहे. हे सिग्नल ओळखणे शक्‍य झाल्यास रोपण केलेल्या उपकरणाच्या मदतीने शरीराशी संवाद साधणे व उपचारपद्धती ठरविणे शक्‍य होईल, असा दावा संशोधक करतात.

‘‘आम्हाला अधिक न्यूरल डेटा मिळवावा लागेल आणि तो समजावून घेण्याची पद्धत विकसित करावी लागेल. बायोइलेक्‍ट्रॉनिक्‍स ही शाखा असा प्रयत्न करीत असून, न्यूरल सिग्नल्सची नक्कल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पार्किनसन्स या आजारामध्ये हालचालींवर मर्यादा येण्याआधीच मेंदूमध्ये इलेक्‍ट्रिकल सिग्नल पाठवून आजारावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न याचे उत्तम उदाहरण आहे. औषधांद्वारे उपचारांवर मर्यादा येत असलेल्या अपस्मारसारख्या आजारांत न्यूरोस्टिम्यूलेशनचा वापर केला जातो आहे. मात्र, न्यूरल डेटामध्ये तुमचा श्‍वासोच्छ्वास, खात असलेले अन्न यांमुळे ‘नॉइज’ निर्माण होतो. हा डेटा अधिक सुस्पष्ट मिळण्यासाठी ‘बोयोस’ प्रयत्न करीत आहे. आम्ही आजारांसाठी नर्व्हस सिस्टिमच्या मदतीने अल्गॉरिदम विकसित करत असून, त्यानंतर उपचारांसाठी केवळ औषधांवर अवलंबून राहावे लागणार नाही. येत्या तीन वर्षांत हे साध्य होईल,’’ असा दावा आर्मिटेज यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article mahesh badrapurkar